Pune Suicide Case : पत्नीचे अनैतिक संबंध समजल्यानंतर पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या पतीला जेव्हा तिचे अनैतिक संबंध असल्याचे समजले तेव्हा त्याने टोकाचे पाऊल (Pune Suicide Case) उचलले. कोहिनूर शिंदे (रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी हिरु पांडू शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणीकंद पोलिसांनी मृताच्या पत्नीसह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपरी सांडस येथे 2021 ते 01 जून 2022 दरम्यान घडला.

Saksham Dance Programme : 30 जून रोजी ‘सक्षम’ नृत्य कार्यक्रमाचे आयोजन

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोहिनूर शिंदे यास त्याच्या सासरकडील मंडळींनी संगनमत करून वेळोवेळी भांडण केले. त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे सायबू शिंदे याने सांगितले. त्यामुळे मानसिक तणावातून कोहिनूर याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Pune Suicide Case) केली. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.