Moshi wife murder : पत्नीशी पटत नाही म्हणून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज : घरगुती वादातून पतीने डोक्यात पाटा घालून खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. (Moshi wife murder) ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास गंधर्वनगरी, मोशी येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

शांताबाई शिवराम एळवे (वय 52) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. शिवराम तुकाराम एळवे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम आणि शांताबाई यांचे नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत होते. दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते. शिवराम हे काहीही काम धंदा करीत नव्हते. मागील चार दिवसांपासून ते एका सुरक्षा रक्षक एजन्सी मध्ये कामाला जात होते.(Moshi wife murder) त्यांना एक मुलगा असून तो एका कंपनीत काम करतो. सकाळी मुलगा कामानिमित्त बाहेर गेला असताना शिवराम आणि शांताबाई यांचा पुन्हा वाद झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलगा घरी आला असता घर आतून बंद होते.

Pimpri News : चिखलीतील जलशुद्धीकरण तर निघोजेतील अशुद्ध पाणीउपसा केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

मुलाने बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मुलाने दरवाजा तोडून आत पाहिले असता शिवराम आणि शांताबाई हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. जवळच दगडी पाटा देखील पडला होता. शांताबाई यांना दोरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न झाला.(Moshi wife murder) त्यानंतर पाट्याने मारून त्यांचा खून केला. शांताबाई यांना मारून शिवराम याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.