Hinjawadi : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. त्यातील 20 लाख रुपये घेतले. राहिलेल्या पैशांसाठी पत्नी, तिचे वडील आणि मामाने पतीचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. ही घटना कोलते पाटील मारुंजी येथे घडली.

अभिजित गणेश खर्डे (वय 38, रा. कोलते पाटील मारुंजी, ता. मुळशी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अभिजितचे वडील गणेश नथ्थुजी खर्डे (वय 65) यांनी रविवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अभिजितची पत्नी नेहा खर्डे (वय 35), तिचे मामा विश्वास जोशी, तिचे वडील नितीन बकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा हिने तिचा पती अभिजित याच्यावर कौटुंबिक त्रासाचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात त्यांच्यात समझोता होऊन 50 लाख रुपये अभिजितने नेहाला देण्याचे ठरले. पैसे घेतल्यानंतर ती सर्व गुन्हे मागे घेणार होती. त्याप्रमाणे अभिजितने नेहाला 20 लाख रुपये दिले.

उर्वरित रक्कम मिळण्यासाठी नेहा तिचे मामा आणि वडिलांनी अभिजितला मानसिक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून अभिजितने 31 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. नेहा, तिचे मामा आणि वडिलांनी केलेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे अभिजितने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.