Crime News : बायकोच्या त्रासाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पत्नी व सासरच्या मांडणीच्या मानसिक त्रासाला कंटाळून मोशी येथे पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे.हा प्रकार 24 ऑगस्ट रोजी मोशी येथे घडला आहे.याप्रकरणी पत्नी व तिच्या माहेरच्या कुटुंबींयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल अंकुश डोंगरे (वय 33 रा. मोशी) असे मयत पतीचे नाव आहे. पत्नी (वय 27 रा. दिघी), संदिप बाळू धेंडे (वय 34) सासू (वय 55), बाळू शंकर धेंडे (वय 64), महिला आरोपी (वय 31) सर्व राहणार पिंपरी यांच्यावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर माहेरच्यांनी मुलीला नांदण्यास न पाठवता मयत पती व त्यांच्या घरच्यांची फसवणूक केली. तसेच मयत पतीवर खूनाचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा ही यावेळी दाखल करण्यात आला. उलटपक्षी पतीलाच नांदण्यास नकार देत घटस्फोट व पैशांची मागणी केली. मयत पतीला 12 लाख रुपये देऊन घटस्फोट दे नाही तर तुझे हातपाय तोडून टाकेन, तसेच घरातील बाया माणसांनाही मारून टाकेन अशी धमकी आरोपी संदिप याने दिली.हा प्रकार 2 फेब्रुवारी 2020 ते 24 ऑगस्ट 2022 या कालावधीत सुरु होता. यावेळी या मानसीक त्रासाला कंटाळून 24 ऑगस्ट रोजी विशाल यांनी राहते घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याचा पुढिल तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.