Sangvi : सासूशी फोनवर न बोलल्याने पतीकडून पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – सासूशी फोनवर न बोलणा-या पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

शीतल अमोल उगीले (वय 30, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी पती अमोल उद्धवराव उगीले (वय 37) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल यांच्या सासूचा २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास फोन आला. फोनवर शीतल त्यांच्या सासू मधुबाला यांच्याशी बोलल्या नाहीत. या कारणावरून चिडलेल्या आरोपी पती अमोल याने शीतल यांना शिवीगाळ केली. गळा दाबून मारहाण केली. तसेच सुरीने मारण्यासाठी अंगावर धावून आला, अशी फिर्याद शीतल यांनी दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.