Pune Crime News : लाईट बिल आणि घर भाड्याचे पैसे नवऱ्याने दारूवर खर्च केल्याने, पत्नीची पेटवून घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज : घर भाड्यासाठी आणि लाईट बिलासाठी जमवलेले पैसे नवऱ्याने दारू पिण्यासाठी खर्च केल्याने बायकोने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मोरे चाळमध्ये बारा एप्रिल रोजी हा प्रकार घडला. मयत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अंकिता कुंदन कांबळे (वय 25) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे त्या प्रकरणी राजू कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेचे वडील व्यंकट नागोराव जाधव (वय 52) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लग्न झाल्यापासून अंकिताचा वारंवार छळ करत होता. लहानसहान गोष्टीवरून तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. बारा एप्रिल रोजी लाईट बिल आणि घराचे भाडे भरण्यासाठी साठवलेले पैसे कुंदन कांबळे याने दारू पिल्यावर खर्च केले होते. अंकिता हिने त्याविषयी विचारणा केली असता तिला त्रास दिला होता. या त्रासाला कंटाळून अंकिता हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.