BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्षा मयूर वचकल, गोरख विठ्ठल खेतामाळीस (रा. श्रीगोंदा, अहमदनगर) आणि गोरख यांची पत्नी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर गंगाराम वचकल (वय 67, रा. तळेगाव दाभाडे) यांनी पोलिसात तक्रार दिली. मयूर वचकल असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर यांची पत्नी प्रतीक्षा आणि तिचे आई-वडील यांनी मयूर यांना वारंवार त्रास दिला. हा प्रकार 26 जुलै 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घडला. या त्रासाला कंटाळून मयूर यांनी 31 मार्च रोजी तळेगाव दाभाडे येथे पुणे-मुंबई महामार्ग शेजारी एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार मयूर यांची पत्नी आणि तिचे आई-वडील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.