pimpri : क्रांतीदिनानिमित्त हुतात्मा चापेकर बंधूंना अभिवादन 

एमपीसी न्यूज – भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती देणा-या क्रांतिवीरांना क्रांतीदिनानिमित्त चिंचवडगाव येथील हुतात्मा चापेकर बंधूंच्या पुतळ्यास, चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास महापालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

चिंचवडगांव येथे झालेल्या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, अनुराधा गोरखे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर आदी उपस्थित होते.

चिंचवड स्टेशन येथील क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथे झालेल्या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी मारुती शिंदे, उदयान निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, आदी उपस्थित होते.

दापोडी येथील शहीद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे येथे झालेल्या कार्यक्रमास नगरसदस्या आशा धायगुडे – शेंडगे, स्वाती ऊर्फ माई काटे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.