Hyderabad News : उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज – उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटलने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली नसली तरी रक्तदाबाचे चढ उतार यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

रजनीकांत गेल्या दहा दिवसांपासून हैद्राबादमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. त्यांच्या सेट वरील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची देखील 22डिसेंबर रोजी चाचणी करण्यात आली. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली मात्र त्यांना काही दिवसांसाठी आयसोलेट करण्यात आले होते.

आज त्यांना उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत सध्या वैद्यकीय निरक्षणखाली आहेत. रक्तदाब व्यतिरिक्त त्यांना कोणताच त्रास नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.