Hyderabad : हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउंटर

एमपीसी न्यूज- हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणारे चार आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना एन्काउंटरमध्ये मारले गेले.  अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना ही घटना आज (शुक्रवार) पहाटे 3 वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी चारही आरोपी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसांना दाद दिली नाही. अखेर त्यांच्यावर पोलिसांना गोळ्या झाडाव्या लागल्या. या गोळीबारात या चौघांचा मृत्यू झाला. हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

आरोपींच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे पुढे आले आहेत. सामूहिक बलात्काराच्या वेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आपण पकडले जाऊ अशी भीती वाटून एका आरोपीने पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती असाही खुलासा पोलिसांनी केला आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.