Sidhu Moosewala Murder Case : मूसेवाला हत्या प्रकरणात मला फसवलं जातंय – संतोष जाधव

एमपीसी न्यूज – पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी (Sidhu Moosewala Murder Case)  अटकेत असलेल्या आरोपी संतोष जाधव याने पोलिसांना सांगितले की,सिध्दू मुसेवाला यांच्या हत्येत मी सहभागी नाही, मला फसविले जात आहे.मूसेवाला यांची हत्या झाली तेव्हा मी गुजरातमधील मुद्रा बंदराजवळील एका हॉटेलमध्ये होतो.

 

 

सिध्दू मूसेवाला हत्याकांडात (Sidhu Moosewala Murder Case)  संतोष जाधवची भूमिका काय होती, याचा तपास करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या पथकाकडून सध्या मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये तपास सुरु आहे.

 

Prakash Amte : प्रकाश आमटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; लवकरच सुरू होणार किमो थेरपी

 

या प्रकरणाचा तपास करणार्या पुणे गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांच्या उच्च अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष जाधवला अटक केल्यानंतर त्याने सिध्दू मूसेवाला यांच्या हत्येतील सहभाग नसल्याचे सांगितले आहे. मूसेवाला यांच्या हत्येच्या वेळी तो पंजाबमध्ये नव्हता, अस त्याचं म्हणण आहे. आपल्याला बळीचा बकरा बनविले जात असल्याच त्याने सांगितले.

 

 

पुणे गुन्हे शाखेच्या सूत्रांच्या माहीतीनुसार, संतोष जाधवने दिलेल्या जबाबात म्हंटले आहे की, हत्येच्या दिवसापूर्वीचे तीन दिवस ते त्यानंतर २९ मेपर्यंत एकूण सात दिवस तो गुजरातमधील हॉटेलमध्ये होता. संतोषच्या वक्तव्यानुसार पंजाब पोलीसांनी जेव्हा फोटो प्रसिध्द केले तेव्हा पकडले जाण्याच्या भीतीने तो घाबरला. त्यानंतर त्याने डोक्याचे मुंडन केले,दाढी, मिशी काढली, वेश बदलला आणि हॉटेलमधून चेकआऊट केले. पुणे गुन्हे शाखेचे पथक मुद्रा बंदर परिसरातील हॉटेलमध्ये त्याच्या जबाबाची चौकशी करण्यासाठी रवाना झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.