Chinchwad : टाटा मोटर्सचा लोगो असलेला शर्ट घालून कंपनीत काम करण्याची इच्छा- सुबोध भावे

एमपीसी न्यूज – मला टाटा मोटर्सचा लोगो असलेला शर्ट घालून एक दिवस तुमच्याबरोबर कंपनीत काम करायच आहे. जेआरडी टाटा यांची भूमिका जर करायला मिळाली तर त्यांच्यामुळे मला हे संधी मिळेल. जेआरडी टाटा यांची भूमिका जर करायला मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी काढले. ते मंगळवारी टाटा मोटर्स कलासागरच्या 38 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना बोलत होते. 

टाटा मोटर्स कलासागरच्या 38 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन टाटा मोटर्स ट्रेनिंग डिव्हिजन हॉस्टेल, पिंपरी येथे सुबोध भावे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी टाटा मोटर्स एम्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी उत्तम चौधरी, सुनील सवई, सरफराज मणेर, रवी कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, मकरंद गांगल, अचित्य सिंग आदी उपस्थित होते.

भावे पुढे म्हणाले, “चित्रपटात काम करताना अनेक अनुभव आले. त्यातच चित्रपटासंबंधी चित्रपट निर्मात्यापासून ते स्पॉट बॉयपर्यंत प्रत्येक जण हा त्या चित्रपटाचा भाग असतो. माझे एकच स्वप्न आहे की कधीतरी मला टाटा मोटर्सचा लोगो असलेला शर्ट घालून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुमच्याबरोबर टाटा कंपनीत काम करायच आहे. जेआरडी टाटा यांची भूमिका जर करायला मिळाली तर त्यांच्यामुळे मला शर्ट घालायला मिळेल.

डॉ.काशिनाथ घाणेकर ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. माझे आणि त्यांचे विचारही पूर्ण वेगळे आहेत. आमची व्यक्तिमत्त्वही वेगळी आहेत. बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि आता डॉ. काशीनाथ घाणेकर साकारताना विचारांशी कुठे तरी साम्य होते. आतापर्यंत या सर्वांची भूमिका करायला मिळाली हे माझे भाग्य समजतो. तसेच वसंत कानेटकर, पु.ल.देशपांडे, शांता शेळके, जगदीश खेबुडकर अशा नामंवत व्यक्तींच्या मध्ये माझी गणना थोर महान व्यक्ती म्हणून होऊ शकत नाही, असे नम्रपणे त्यांनी नमूद केले.

आतापर्यंत चित्रपटात मला बालगंधर्व, लोकमान्य टिळक असो किंवा डॉ. काशीनाथ घाणेकर यांना पडद्यावर का होईना स्पर्श व संवाद साधता आला. या अर्थाने मला काही काळ वेगळे विश्व निर्माण करणा-या अलौकिकांना बघता आले. जवळून बघता आले. जेआरडी टाटा यांची भूमिका जर करायला मिळाली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन” ‘तुला पाहते रे’ मधील माझ्या भूमिकेमुळे ४० च्यातील लोकांचा कॉन्फीडन्स वाढला. समाजातही कॉन्फिडन्स वाढला आहे, असे सुबोध भावे म्हणताच श्रोत्यांमध्ये हास्याचा फवारा उठला.

यावेळी कलासागर दिवाळी अंकातील कथा, कविता स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात प्रांजल बारी, सिया सामंत, नेहा केळकर, ज्ञानेश्वरी वायाळ, मौली बिसेन, महेश संपथ, दीप्ती नाईक, आरती जावडेकर, स्नेहल शहरकर, हरिणी श्रीवास्तव, केशर भुजबळ, आसावरी मेस्त्री, श्रीराम परदेशी, स्मिता परदेशी, संगीता घिल्डियाल, विष्णू नाईक, संगीता घिल्डियाल यांचा तर विशेष लेखनमध्ये प्रदीप बगाडे, विष्णू नाईक, आसावरी मेस्त्री, मनोजकुमार मोरे, आरती जावडेकर, मानसी चिटणीस, ऋतुजा नरवडे, प्रदीप वाघ, सुहासिनी येवलेकर, दीपाली कुलकर्णी, विलास वायाळ, लक्ष्मण कुमावत, स्मिता नाईक, आशा भोर, केतकी मंडपे, कमल सोनजे, नितीन कोंडाळकर, विठ्ठल भोर, आरती येवलेकर, उस्मान सौदागर, वेदांती खुपरेकर तर मराठी कवितांमध्ये अनिता उन्हाळे, परेश निपुणगे, मृणाल वाळिंबे, समीर नगरकर, कल्पना येळगावकर, एेश्वर्या खळदकर, राजगोंडा पाटील तर मराठी लेख कल्पना येळगावकर, शीतल माने, आदित्य कोरडे.

मराठी ललित लेखन – सुनीता पाटील, अंबिका परदेशी, अश्विनी विभुते, पुजा सामंत, सीमा गांधी, नंदकिशोर हुरसाड तर मराठी कथामध्ये एकनाथ पाटील, अनिता पालारपवार, अनिता उन्हाळे, ज्ञानेश रहाणे, शिरीष पदकी,जयश्री श्रीखंडे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीरेंद्र वायाळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रियंका बागल यांनी केले. आभार मयुरेश कुलकर्णी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.