गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Pune News : शहरात जागोजागी लावलेले I LOVE चे फलक हटवण्याचे आदेश

एमपीसी न्यूज : आय लव्ह स्वारगेट, आय लव बिबेवाडी, आय लव कात्रज, आय लव न-हे असे फलक आपण शहरातील अनेक (I LOVE Banner) भागात पाहिले असतील. अगदी दर्शनीय स्थळी हे फलक लावलेले पुणे शहराच्या अनेक परिसरात दिसून येते. मात्र आता हेच फलक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांनी काढले आहेत. पादचारी मार्गावर असणारे, रस्त्यांना अडथळा करणारे आणि अनधिकृत वीज जोड घेतलेले शहरातील 73 फलक हटवण्याचे आदेश आयुक्ताने दिले आहेत.
खरंतर काही वर्षांपूर्वी शहरात अचानक ‘आय लव’ अशी संकल्पना असणाऱ्या सेल्फी पॉइंटची मोठी लाट निर्माण झाली होती. याच लाटेत महापालिकेतील नगरसेवकांनी आपले हात धुवून घेतले आणि जवळपास प्रत्येक वार्डात असे फलक उभारले. यासाठी नगरसेवकांच्या सह यादीतून दोन ते दहा लाख रुपयापर्यंत निधी खर्च केला. या माध्यमातून स्वतःच्या नावाची जाहिराती केली. मात्र, हे काम करत असताना पथ अथवा विद्युत विभागाला अंधारात ठेवले गेले.
त्यानंतर आता हे सर्व फलक काढण्याचे आदेश महापालिका आयुक्ताने दिले आहेत. या फलकामुळे शहराचे विद्रूपीकरण तर झालेच आहे. मात्र अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणे, पार्किंगला अर्थ राहू नये, पदपथाची जागा व्यापणे यासारख्या अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी अशा सर्व अनधिकृत फलकांची माहिती मागवली असून जवळपास 73 फलकांवर (I LOVE Banner) कारवाई करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत. येत्या तीन दिवसात हे सर्व फलक काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
Latest news
Related news