I want to become Mr. India: मला मिस्टर इंडिया बनून चीनशी लढायचे आहे…

I want to become Mr. India and fight China says little girl to shekhar kapur लहान मुलांना देखील चित्रपटाची ही दुनिया खरीच वाटत असते. म्हणूनच 'मिस्टर इंडिया’ या एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमधील मिस्टर इंडिया खरंच अस्तित्वात आहे, असेच लहान मुलांना वाटते.

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करु शकत नाही. लहानपणापासून विविध विषयांवरील चित्रपटांचा आपल्या आयुष्यावर खूपच प्रभाव असतो. त्यात जे दाखवले जाते ते खरे असते असेच आपल्याला वाटते.

लहान मुलांना देखील चित्रपटाची ही दुनिया खरीच वाटत असते. म्हणूनच ‘मिस्टर इंडिया’ या एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमधील मिस्टर इंडिया खरंच अस्तित्वात आहे, असेच लहान मुलांना वाटते.

नव्वदच्या दशकातील ‘मिस्टर इंडिया’ या सायन्स फिक्शन चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केली होती. या चित्रपटाचा हिरो म्हणजे अभिनेता अनिल कपूर एक ब्रेसलेट घातले की गायब होतो आणि लाल रंगासमोर प्रकट होतो.

चित्रपटातील ही ट्रीक बघून अशीच गायब होण्याची शक्ती एका लहान मुलीने शेखर कपूर यांच्याकडे मागितली आहे. तिला ‘मिस्टर इंडिया’ बनून चीनशी लढायचं आहे.

तिच्या या चकित करणाऱ्या मागणीवर शेखर कपूर यांनी देखील तितकेच मजेशीर उत्तर दिलं आहे. चमन वार्ष्णेय नावाच्या एका व्यक्तीने आपल्या लहान मुलीची मागणी ट्विटरद्वारे शेखर कपूर यांना सांगितली.

‘माझ्या मुलीला मिस्टर इंडिया हा चित्रपट खूप आवडतो. मिस्टर इंडिया बनून तिला चीनशी लढायचं आहे’, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

या ट्विटवर शेखर कपूर यांनी देखील गंमतीशीर उत्तर दिले. ‘जेव्हा तुमची मुलगी मोठी होईल. तेव्हा मी तिला मिस्टर इंडियाचं अदृश्य होण्याचं रहस्य पाठवेन’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

शेखर कपूर यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘मिस्टर इंडिया’ बॉलिवूडमधील मोजक्या सायन्स फिक्शन चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला होता. परंतु आज २३ वर्षानंतरही हा चित्रपट तितकाच लोकप्रिय आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.