Hinjawadi Crime News : ‘जेलमध्ये गेलो तरी चालेल पण तुम्हाला मारुन टाकणार’, उसने दिले नाही म्हणून धमकी

एमपीसी न्यूज – उसने दिले नाही म्हणून शिवीगाळ करून फरशीचा तुकडा फेकून मारला तसेच, ‘जेलमध्ये गेलो तरी चालेल पण तुम्हाला मारुन टाकणार’ अशी धमकी देत दुचाकीची तोडफोड केली. मारुंजी रोड, हिंजवडी येथे शुक्रवारी (दि.22) सायंकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

लक्ष्मण अशोक मांजरे (वय 25, रा. मारुंजी रोड, हिंजवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश भागवत मांजरे (वय 30, रा. मारुंजी रोड, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मण याला फिर्यादी गणेश यांनी उसने पैसे दिले नाहीत, या कारणावरुन आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून फरशीचा तुकडा फेकून मारला. तसेच, ‘जेलमध्ये गेलो तरी चालेल पण तुम्हाला मारुन टाकणार’ अशी धमकी देत दुचाकीची तोडफोड केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.