Akurdi News : ‘आयएएस’ची पुणे-पंढरपूर-पुणे सायकलवारी 18, 19 जून रोजी

एमपीसी न्यूज – संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या पुणे-पंढरपूर-पुणे सायकल वारीचे रजिस्ट्रेशन लिंकचे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी ही वारी 18 जून आणि 19 जून या दोन दिवसात संपन्न होणार आहे.

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकादशी निमित्त रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले. याप्रसंगी मंदिराचे प्रमुख विश्वस्त गोपाळ कुटे , पोलीस अधिकारी अजय दरेकर, वन विभागातील आयएफएस अधिकारी नानासाहेब लडकत, उद्योजक अण्णा बिरादर, इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे गणेश भुजबळ, अजित पाटील उपस्थित होते.

या वारीचे 7 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व 1000 हून अधिक सभासद एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर 18 जून रोजी पार करणार आहेत. तर, दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीची वारी करणार आहेत असे संस्थेचे सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले. अशोक महाजन यांच्या तर्फे संस्थेला पंढरपूर वारीसाठी दहा हजार रुपयाची देणगी देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या कोअर टीमचा सहभाग आहे. प्रा. योगेश तावरे, गिरीराज उमरीकर, नितीन पवार, प्रज्ञा अजगर, सोनल वामन, रमेश माने, तन्मय माने, कविता कोल्हे, दत्तात्रय कुलकर्णी, अमित पवार , कपिल पाटील, स्वामिनाथन श्रीनिवासन, जनार्धन कात्तुल, प्रीथी नारायणन, भूषण तारक, अजित गोरे, राहुल जाधव यांच्यातर्फे सूत्रसंचालन व आभार व्यक्त करण्यात आले. इच्छुक सायकलस्वरांनी नाव नोंद करण्यासाठी www.Indoathleticsociety.com स्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.