ICC Meeting: उद्या ‘आयसीसी’ची बैठक, T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता

ICC meeting tomorrow, likely to decide on T20 World Cup व्हिक्टोरिया राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे महिन्यातच या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शविली होती.

एमपीसी न्यूज – ‘आयसीसी’ची उद्या (सोमवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष लागून आहे. T20 विश्वचषक 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

परंतु, व्हिक्टोरिया राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मे महिन्यातच या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दर्शविली होती.

_MPC_DIR_MPU_II

भारत ऑस्ट्रेलियाबरोबर 2021 वर्ल्ड T20 आयोजनाचे हक्क बदलू इच्छित नसल्याने यंदाचा T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होईल असे म्हटले जात आहे.

शिवाय, ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना सप्टेंबरच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध व्हाईट बॉल मालिकेसाठी तयारी करण्यासाठी सांगितले आहे. त्या दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 26 खेळाडूंच्या प्राथमिक संघाची घोषणा देखील केली आहे.

भारतमध्ये कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली तर आयपीएलचे आयोजन यूएई मध्ये केलं जाऊ शकतं.

एकूणच आयसीसीच्या या बैठकीकडे सर्व भारतीयांसह बीसीसीआयचे लक्ष लागून आहे. कारण विश्वकप विश्वचषक रद्द झाला तर आयपीएलचा रस्ता मोकळा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.