ICC Nominations : ‘आयसीसी’च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी विराट कोहलीला नामांकन

एमपीसी न्यूज – ‘आयसीसी’च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी कर्णधार विराट कोहलीला नामांकन मिळालं आहे. यासह इतर पाचही गटात नामांकन मिळाले आहे. दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या शर्यतीत फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनलासुद्धा नामांकन देण्यात आले आहे. तसेच, या यादीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रूट, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा यांचा समावेश आहे.
‘आयसीसी’च्या पाच विविध विभागात दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी भारतीय टिमसह इतर देशांच्या दिग्गज खेळाडूंच्या नावांची वर्णी लागली आहे. ‘आयसीसी’च्या संकेतस्थळावर या खेळाडूंना मत देण्याची सुविधा चाहत्यांना उपलब्ध असून सर्वाधिक मते मिळणाऱ्या खेळाडूला पुरस्कार दिला जाणार आहे.
कोणत्या विभागात कोणत्या खेळाडूला नामांकन ?
दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू– विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, लसिथ मलिंगा, मिचेल स्टार्क, एबी डीव्हिलियर्स, कुमार संगाकारा
दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू– विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, जेम्स अँडरसन, रंगना हेराथ, यासिर शाह
दशकातील सर्वोत्तम T20 खेळाडू- रोहित शर्मा, राशिद खान, विराट कोहली, इम्रान ताहीर, आरोन फिंच, लसिथ मलिंगा, ख्रिस गेल
दशकातील सर्वोत्तम महिला खेळाडू– एलिस पेरी, मेग लॅनिंग, सुझी बेट्स, स्टेफनी टेलर, मिताली राज, सारा टेलर
Soon… 👀 pic.twitter.com/9zO6mmw9o8
— ICC (@ICC) November 24, 2020
दशकातील सर्वोत्तम T20 महिला खेळाडू– मेग लॅनिंग, सोफी डिव्हाइन, एलिस पेरी, डीआंड्रा डॉटीन, एलिसा हेली, अन्य श्रबसोल
दशकातील सर्वोत्तम वन-डे महिला खेळाडू– मेग लॅनिंग, एलिस पेरी, मिताली राज, सुझी बेट्स, स्टेफनी टेलर, झुलन गोस्वामी
दशकातील खिलाडूवृत्ती पुरस्कार– विराट कोहली, केन विल्यमसन, ब्रेंडन मॅक्कलम, मिस्बाह उल हक, महेंद्रसिंग धोनी, अन्या श्रबसोल, कॅथरिन बर्न्ट, महेला जयवर्धने, डॅनियल व्हेटोरी
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.