ICC ODI Ranking : तीन वर्षांनंतर मिताली राज पुन्हा ठरली अव्वल क्रिकेटर

एमपीसी न्यूज – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा नंबर एकची क्रिकेटर ठरली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या मालिकेत मितालीने केलेल्या जोरदार कामगिरीच्या जोरावर तिने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे.

भारत आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत मिताली राजने तिन्ही सामान्यात अर्थशतकी खेळी खेळली. पहील्या व दुसऱ्या सामन्यात तिने अनुक्रमे 72 व 59 धावांची खेळी खेळली तर तिस-या सामन्यात मितालीने नाबाद 75 धावांची खेळी केली. दरम्यान भारताने ही मालिका 2-1 अशी गमावली. फेब्रुवारी 2018 मध्ये मिताली राज पहिल्या स्थानावर होती.

मिताली राज हिने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. 38 वर्षीय मितालीने 21 वर्षाच्या करिअर मध्ये 217 एकदिवसीय सामने, अकरा कसोटी आणि 89 T20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात तिने 51.80 च्या सरासरीने 7 हजार 304 धावा केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.