ICC Team of the Decade : आयसीसीच्या दशकातील एकदिवसीय, कसोटी व T20 संघ जाहिर, या भारतीस खेळाडूंना मिळाले स्थान

एमपीसी न्यूज – आयसीसीनं दशकातील सर्वोत्तम अकरा एकदिवसीय, कसोटी व T20 खेळाडूंची निवड केली आहे. आयसीसीनं निवडलेल्या प्रत्येक संघात भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

आयसीसीच्या एकदिवसीय व T20 संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा पूर्व कर्णधार एम एस धोनी याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच, कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे.

आयसीसीचा एकदिवसीय संघ –
रोहित शर्मा, डेव्हिड वार्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शाकिब अल हसन, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, ट्रेन्ट बोल्ट, इमरान ताहिर, लसिथ मलिंगा

कसोटी संघ –
अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वार्नर, विराट कोहली (कर्णधार), केन व्हिल्मसन, स्टिव्ह स्मिथ, कुमार संगाकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, आर आश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अ‍ॅन्डरसन

T20 चा संघ –
रोहित शर्मा, ख्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), कायरन पोलार्ड, राशिद खान, जसप्रित बुमरहा, लसिथ मलिंगा

यासह आयसीसीने आसोसिएट प्लेअर ऑफ द ईअर चा पुरस्काराची पण आज घोषणा केली. यामध्ये पुरूषांच्यात स्कॉटलंडचा फलंदाज काइल कोएत्झर याला तर, महिलांच्यात कॅथ्रीन ब्रिस हिचं नाव जाहिर केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.