ICC Test Ranking : विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा टॉप फाईव्ह मध्ये

एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिका सुरू असताना ICC ने कसोटी रॅकिंग जाहीर केले आहे. कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट पहिल्या स्थानावर असून, भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्माने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. पाच वर्षात पहिल्यांदाच कर्णधार विराट कोहली टॉप फाईव्ह मधून बाहेर गेला आहे.

खराब कामगिरीमुळे विराट कोहलीला फटका बसला असून, 766 गुणांसह तो सहाव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 773 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा कसोटीत चांगली कामगिरी करत आहे. दोन वर्षापूर्वी जेव्हा रोहित शर्माला कसोटीत संधी देण्यात आली होती. तेव्हा तो 53 व्या स्थानी होता. मात्र, चांगल्या खेळीमुळे तो टॉप फाईव्ह मध्ये पोहोचला आहे.

कसोटी गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 908 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 839 गुणांसह आर. अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. तर, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या क्रमवारीत 758 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.