ICMR Clarification: ‘आयसीएमआर’च्या नावाने व्हायरल झालेला ‘तो’ सर्वेक्षण अहवाल बोगस

ICMR Explanation: That survey report is bogus, which has gone viral under the name ICMR. देशात नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल, असा आयसीएमआरच्या नावाने फिरत सर्वेक्षण अहवाल खोटा असल्याचे आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) नावाने सध्या विविध माध्यमांमध्ये एक सर्वेक्षण अहवाल फिरत आहे. त्यात नोव्हेंबर महिन्यात देशात कोरोनाचा सर्वात मोठा उद्रेक होणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र, हा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण आज दुपारी आयसीएमआरने केले आहे.

आयसीएमआरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भात ट्वीट करत त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने होताना दिसत आहे. अशातचं एक धक्कादायक सर्वे आयसीएमआरच्या नावाने फिरत आहे. या सर्वेनुसार देशात नाव्हेंबरच्या मध्यात कोरोनाचं विनाशकारी रुप पाहायला मिळेल. देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे कोरोना संसर्गाचा सर्वोच्च टप्पा (Peak) हा पुढे ढकलण्यात यश मिळाले. मात्र, हा पिक नोव्हेंबर महिन्याच्या मध्यास येऊ शकतो, असं या अहवालात मांडण्यात आले आहे. हे सर्वे आयसीएमआरच्या सदस्याने केल्याचा दावा अनेक माध्यमांनी केले आहे.

देशात लॉकडाऊन जाहीर केल्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कारण, कोरोना संसर्गाचा सर्वोच्च टप्पा 34 दिवसांनी येणार होता, तो आता 74 दिवासांवर पुढे ढकलला असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यात नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाचं विनाशकारी चित्र असेल, असा दावा करण्यात आलेला आहे. हा सर्वेक्षण अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या नावाने फिरत होता. मात्र, हा अहवाल खोटा असल्याचे आयसीएमआरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.