Nigdi News : आदर्श शिक्षक अच्युतराव दिवाण यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी येथील जेष्ठ नागरिक आणि निवृत्त शिक्षक अच्युतराव दिवाण यांचे शनिवारी (दि.17) मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

निगडी येथील जेष्ठ अस्थीरोग तज्ञ डॉ. अभय दिवाण हे त्यांचे चिरंजीव होत. परभणी जिल्ह्यातील पाथ्री या गावी त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केले आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा परिसरात लौकिक होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.