Satara News : प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असंत तर हि वेळ आलीच नसती : खासदार उदयनराजे भोसले

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लादले आहेत. दुसरीकडे लसीचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद पडले आहे. यावरून केंद्र आणि राज्य असा वाद सुरू असून, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देशात फॅमिली प्लॅनिंगचे योग्य नियोजन केले असत तर आज लसींचा तुटवडा झाला नसता.असं विचित्र विधान केलं आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अंशतः लॉक डाऊनची घोषणा केली. मात्र या लादण्यात आलेल्या निर्बंधाने व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ आल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील व्यापारी यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

‘आपल्या देशाची लोकसंख्या पाहा किती आहे ते. हे बघा उगाच काही वाद निर्माण करण्यापेक्षा ना प्रत्येक राज्याला योग्य तेवढ्या लस मिळाल्या पाहिजे. महाराष्ट्राला का जास्त दुसऱ्या राज्याला का कमी? ज्या राज्यात जेवढी लोकसंख्या आहे त्याप्रमाणे लस देण्यात यावी.

आता तुम्ही कोरोना लसीच्या तुटवड्याविषयी बोलत आहात. मग मी म्हणतो प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असंत तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली असती का? आपल्याला समजलं पाहिजे. जे इतर देश आहेत युरोप वैगरेमध्ये इथे व्यवस्थित फॅमेली प्लॅनिंग असतं.’ असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘जे लोक कोरोनाने मरत आहेत, ती जगण्याला लायक नाहीत,’ असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले होते. कोरोना हा रोग नसून तो मानसिक आजार असल्याचेही भिडे यांनी म्हटले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.