Pimpri: महासभेला पीएमपीएमएलच्या अध्यक्षा न आल्यास बस खरेदीचा विषय तहकूब करणार

महापौर राहुल जाधव यांची माहिती

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएल)च्या पिंपरी-चिंचवड शहरातील सेवेबाबत नगरसेवकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या समस्या आहेत. त्या मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी पीएमपीएलएच्या अध्यक्षांनी पालिकेत उपस्थित राहून सदस्यांच्या शंकाचे निरसन करावे. उद्या होणा-या महासभेसमोर बस खरेदीचा प्रस्ताव असून पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे या सभेला आल्यातरच हा विषय मंजूर करणार असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

पीएमपीएलची सार्वजनिक वाहतुक अधिक सक्षम व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका 200 बस खरेदी करून पीएमपीएलला देणार आहे. हा विषय मंजुरीसाठी उद्या होणार्‍या सर्वसाधाण सभेपुढे आहे. हा विषय मंजूर करण्यास आम्ही तयार आहोत. पंरतु, या सभेला पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी उपस्थित रहावे. सदस्यांच्या शंकाचे निरसन करावे. त्या महासभेला उपस्थित नाही राहिल्यास सदर विषय तहकूब करण्यात येईल, असे महापौर जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.