Ambi Bridge : आंबी पुलाचे काम पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेणार – नितीन मराठे

एमपीसी न्यूज : आंबी (Ambi Bridge) येथील पुलाचे काम पूर्ण न झाल्यास येत्या सोमवारी (दि.12) जलसमाधी घेणार आहे, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी दिला आहे. याबाबतचे निवदेन त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी राजेश पाटील यांना दिले आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, वराळे-आंबी व तळेगाव एमआयडीसीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जुना पुल हा अवजड वाहनांमुळे ढासळला असून त्यानंतर नवीन पुलाचे काम सुरु करण्यात आले. नवीन पुलाचे काम गेली 3 ते 4 वर्षापासून चालू आहे. जवळजवळ 80 टक्के काम पहिल्या टप्यातील पुर्ण झाले असून 20 टक्के काम गेली 2 वर्षे पुलाचे काम पुर्णतः थांबलेले आहे. जवळजवळ 8 ते 9 गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पुल बंद असल्यामुळे सर्व नागरीकांना, एमआयडीसी कामगारांना व शेतकरी बांधवांना तसेच एमआयडीसरीतल सर्व कंपन्यांची वाहतूक 9 ते 10 किमी अंतराचा वळसा घालून होत आहे.

Nigdi : अंतकरणातून आलेल्या शब्दांच्या ओळी म्हणजे कविता – राज अहेरराव

संबधित पुलाच्या काम चालू करण्यासाठी संबधित खात्याच्या (Ambi Bridge) अधिकाऱ्यांना भेटूनसुद्धा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. 7 दिवसांत योग्य ती कार्यवाही करुन पुलाचे काम चालू करावे व लवकरात लवकर पुल नागरीकांसाठी खुला करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.