MPC NEWS VIGIL: वृक्षतोडीच्या नियमांबाबत चूक होत असल्यास त्यात सुधारणा करणार – आयुक्त हर्डीकर

पालिकेचा 'ग्रीन पॉकेट' निर्मितीवर भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीने विकासकामासाठी अडथळा ठरणारे एखादे झाड तोडण्यास परवानगी देताना सर्व नियनांचे पालन केले जात आहे.

नोटीस चिटकविणे, वृत्तपत्रात जाहिरात देणे. या नियमांचे पालन केले जात नसेल. तर, त्यात सुधारणा करण्यात येईल, अशी ग्वाही वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. तसेच पालिकेचा ‘ग्रीन पॉकेट’ निर्मितीवर भर देत आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीच्या तक्रारी सारथी हेल्पलाईनवर करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीने मागील पाच वर्षात 14 हजार 348 झाडांची कत्तल झाली. तर, 6105 झाडांच्या पुनर्रोपणास परवानगी दिली आहे. वाढती वृक्षतोड, वृक्षतोडी दरम्यान होत असलेले नियमांचे उल्लंघन यावर ‘एमपीसी न्यूज’ने सद्यस्थिती जाणून घेतली.  पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांची मतेही जाणली होती.

त्यावर पालिका प्रशासनाची बाजू सांगताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,  पालिकेने विकास कामांसाठी पाच वर्षात 14 हजार झाडे तोडली असली. तरी नवीन लागवड देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तीन वर्षात साधारणात तीन लाखाच्या आसपास वृक्षलागवड केली आहे.   2019 मध्ये दीड लाख, 2018 मध्ये एक लाख आणि 2017 मध्ये 50 ते 60 हजार झाडे लावली आहेत.

मागील तीन वर्षात जेवढी तोडली. त्याच्या वीसपट झाडे निश्चितपणे लावली आहेत. एक झोडण्याची परवानगी दिली जाते. त्यावेळी नागरिकाला किमान पाच झाडे लावण्यास सांगितले जाते.  जर झाडे नाही. लावली तर त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. या पैशांतून मोकळ्या जागांवार वृक्षारोपण केले जाते.

मागील तीन वर्षात मिलिट्रीशी टायप करुन त्यांच्या पडीक जागांवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली. हरित क्षेत्र तयार करण्यावर भर दिला जात आहे. एखादे झाड तोडण्यास परवानगी देण्यासाठी सर्व नियनांचे पालन केले जात आहे. नोटीस चिटकविणे, वृत्तपत्रात जाहिरात देणे.याचे पालन केले जात नसेल. तर, त्यात सुधारणा करण्यात येईल. बेकायदेशीर वृक्षतोडीच्या तक्रारी सारथी हेल्पलाईनवर तक्रारी घेतल्या जातात, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.