_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : या ठेकेदाराने पोलिसांचे काम असे केले तर बाकीच्यांचे काय? अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावले

0
एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टवक्ते असल्याचा प्रत्यय यापूर्वी अनेकदा आला. एखादा व्यक्ती चुकला असेल तर जाहीर कार्यक्रमातही ते त्याचा पाणउतारा करतात. त्याचाच प्रत्यय आज पुणे पोलिसांना आलाय. पोलीस मुख्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूंचे अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी या वास्तूच्या कामाचा दर्जा पाहून अजित पवारांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह ठेकेदाराला चांगलेच सुनावले. 

अजित पवार म्हणाले, अशा कामाच्या पाहणीसाठी मला बोलावले तर मी लई बारकाईने पाहत असतो. माझ्याच भाषेत सांगायचे तर हे खूप छा-छु काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचीच काम असे केले असेल तर बाकीच्यांचे काय ? असा प्रश्न विचारत त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना धारेवर धरले. तसेच तुम्हाला कामच पाहायचे असेल तर बारामतीला या दाखवतो असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

अजित पवारांचा हा स्पष्टवक्तेपणा पाहून उपस्थित असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अजित पवारांचा समोर ठेकेदाराला उभे करण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे मात्र पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. खरं तर नूतनीकरण केलेल्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी अजित पवारांना बोलावण्यात आलं होतं. अजित पवारांनी मात्र या कामातील त्रुटी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या आणि त्यांना चांगलीच सुनावली देखील. अजित पवारांच्या या स्पष्टवक्तेपणा ची आज संपूर्ण पुणे पोलिस दलात चर्चा सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment