Vaccination News : परदेशात जाणार असाल तर आता लसीच्या दुसऱ्या डोस साठी 84 दिवस थांबण्याची गरज नाही

एमपीसी न्यूज : परदेशात जाण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे. मात्र कोव्हिशिल्ड लसीचा डोस सध्या 84 दिवसांनंतर देण्यात येतो. मात्र आता परदेशात जाण्यासाठी विद्यार्थी-नोकरदारांससह पर्यटक, व्यावसायिकांना देखील दुसऱया डोसच्या 84 दिवसांच्या मुदतीची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे परदेशात जाण्याऱया सर्वांनाच तिकीट, व्हिसा-ओळखपत्र दाखवल्यास कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर केव्हाही घेता येईल.

पालिकेच्या या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयाचा फायदा सर्वांनाच घेता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. विद्यार्थी किंवा नोकरीसाठी जाणाऱयांसाठीच 84 दिवसांची अट शिथिल करण्यात आली होती. यानुसार पालिकेच्या महत्त्वाच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. यानंतर आतापर्यंत एकूण 90 लाख 10 हजार 49 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 66 लाख 54 हजार 499 जणांनी पहिला डोस तर 23 लाख 55 हजार 550 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. प्रमुख, उपनगरीय रुग्णालयांसह जम्बो कोविड सेंटर आणि प्रत्येक वॉर्डात लसीकरण केंद्रे सुरू आहेत.

पालिका आणि सरकारच्या एकूण 445 लसीकरण केद्रांवर डोस दिले जात आहेत. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिकची लस दिली जात आहे. पालिकेकडे दररोज 2 लाख डोस देण्याची यंत्रणा आहे. मात्र पुरेसे डोस मिळत नसल्याने एकाच दिवसात 50 हजार, एक लाख तर कधी दीड लाखांवर डोस दिले जात आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.