Nigdi News : ‘तुम्ही मला पकडले तर तुम्हाला तलवारीने मारून टाकील, पोलिसांना धमकी देणारे अटकेत

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे तलवारी बाळगल्या प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता ‘तुम्ही मला पकडू नका. तुम्ही जर मला पकडले तर मी तुम्हाला तलवारीने मारून टाकील’ अशा धमकी देत एकजण तलवार घेऊन थेट पोलिसांच्या अंगावर धावून आला. हा प्रकार शनिवारी (दि. 18) दुपारी प्राधिकरण निगडी येथे घडला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शाहरुख शाहिद शेख (वय 20, रा. टॉवर लाईन चिखली), गजानन सहदेव पवार (वय 28, रा. दत्तवाडी, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सोनू केंगले यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राधिकरण निगडी येथे दोघेजण तलवार घेऊन थांबले असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी पोलीस नाईक केंगले आणि त्यांचे सहकारी कारवाई कारण्यासाठी गेले. आरोपी गजानन याने फिर्यादी यांना ‘तुम्ही मला पकडू नका. तुम्ही जर मला पकडले तर मी तुम्हाला तलवारीने मारून टाकील’ अशा धमकी दिली.

तसेच गजानन हा पोलिसांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आला. त्यानंतर आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ केला. पोलिसांनी दोघांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान आरोपींनी पोलिसांशी झटापटी करून ‘तुम्हाला बघून घेतो’ असे म्हणत शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.