Singapore News : तुमची संपत्ती पाचशे कोटी ची असेल तर तुम्हाला मिळेल कोरोना काळात सिंगापूर मध्ये आसरा

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील विविध देशातील अति श्रीमंत लोकांनी सिंगापूरचा आसरा घेतला आहे. विशेषता भारत चीन मलेशिया आणि आणि इंडोनेशियातील अति श्रीमंतांना सिंगापूर हे अतिशय सुरक्षित ठिकाण वाटत आहे.

मात्र त्यासाठी तुमची किमान पाचशे कोटी ची संपत्ती असेल किंवा वार्षिक व्यवसायिक उलाढाल 14 कोटी पेक्षा जास्त असेल तर त्याला त्वरित सिंगापूरचे नागरिकत्व दिले जाते गेल्या वर्षभराच्या कालावधीत मध्ये अनेक अति श्रीमंतांनी सिंगापूरचे नागरिकत्व स्वीकारल्याने गेल्या वर्षभराचा कालावधी मध्ये लक्झरी कारच्या विक्रीमध्ये तब्बल 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सिंगापुरात काम करणाऱ्या एका खाजगी वेल्थ मॅनेजमेंट फर्मचे प्रमुख स्टीफन रेपको यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये परदेशी नागरिकांनी सिंगापूरमध्ये वास्तव्य करण्याचे प्रमाण वाढले आहे अनेक परदेशी लोकांनी सिंगापूरमध्ये निवासस्थान शोधले आहे त्याशिवाय अनेक लोकांनी यासाठी अर्ज दाखल केला असून हा अर्ज स्वीकारला जाण्याच्या प्रतीक्षेत ते आहेत.

सिंगापूर मध्ये करोनाचे प्रमाण अतिशय कमी असून लसीकरणाचा वेगही जास्त आहे त्याशिवाय सिंगापूरमधील विमानसेवा अतिशय सोपी आणि सहज झाली आहे सिंगापूर मध्ये अतिशय कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होत असल्याने जगातील बहुतेक लोकांना सिंगापूरचे आकर्षण वाटत आहे.

सिंगापूरच्या विमानतळावर हँगर स्पेसची मागणी गेल्या वर्षभराच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाढली आहे जगभरातील अतिश्रीमंयांचा ओढा सिंगापूर कडे वाढल्याने अनेक महत्वाच्या कंपन्या आणि बँका यांनी आपला आपल्या शाखा सिंगापूरमध्ये विस्तारित करण्याची योजना सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.