चमचमीत फिशवर आडवा हात मारायचाय, मग त्यासाठी नक्की भेट द्या प्राधिकरण येथील हॉटेल रागाच्या खास फिश फेस्टिव्हलला

एमपीसी न्यूज – सध्या सरत्या वर्षाला म्हणजे २०१९ ला दणक्यात निरोप देण्यासाठी वेगवेगळे बेत आखण्यात सगळेच जण बिझी आहेत. आणखी थोड्याच दिवसात २०१९ साल हा भूतकाळ होणार असून मॅजिकल असे २०२० येणार आहे. त्यासाठी पार्टी कुठे करायची, मेन्यू काय ठेवायचा, का घरीच पार्सल मागवायचे अशी अॅरेंजमेंट सुरु आहे. अशा वेळी जर तुमचा प्रेफरन्स फिशला असेल तर प्राधिकरण येथील हॉटेल रागा हा एक बेस्ट ऑप्शन उपलब्ध आहे.

प्राधिकरण येथील हॉटेल रागा येथे फिश फेस्टिव्हल सुरु असून फिशचे अनेकविध पर्याय सध्या येथे मनसोक्त खायला मिळतील. मत्स्यप्रेमींसाठी हिवाळा हा अत्यंत लाडका ऋतू असतो. कारण यावेळी हरत-हेचे मासे मुबलक, स्वस्त मिळतात. तसेच कोणतेही सण, समारंभ, उपवास नसतात. त्यामुळे माशांवर अगदी आडवा हात मारता येतो. नेमकी हीच गोष्ट लक्षात ठेवून सध्या हॉटेल रागा येथे येत्या महिनाभर फिश फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे, असे हॉटेल रागाचे राहुल गावडे यांनी सांगितले.

आपल्या जेवणाची सुरुवात सूपने करण्यासाठी येथे अनेक पर्याय आहेत. चिली क्रॅब सूप, सीफूड लक्सा सूप, प्रॉन्स मलाया सूप आणि सीफूड शोरबा येथे उपलब्ध आहे. स्टार्टर्समध्ये तर भरपूर वैविध्य आहे. बटर फ्राय प्रॉन्स तर मस्ट ट्राय प्रकारातील. त्याशिवाय सीफूड नाचोज, सुरमई, बोंबिल, मच्छी आणि हो यावेळी येथे चक्क स्क्विड या सहसा सहजगत्या न मिळणारा माशाचा वेगळा प्रकार उपलब्ध आहे. स्क्विडला पाश्चिमात्य कुझिनमध्ये डेलिकसी मानले जाते. या स्क्विडचे लेमन, पेपर, आंध्रा चिली, केरला फ्राय, भिना, तवा, रवा, कोळीवाडा इत्यादी प्रकारातील डिश येथे उपलब्ध आहेत. स्क्विडच्या या डिश तर अगदीच मस्ट ट्राय या प्रकारातील. तसेच सीफूड प्लॅटर, प्रॉन्स प्लॅटर, सुरमई प्लॅटर आणि मच्छी की टोकरी येथे आपल्यासाठी उपलब्ध आहे.

तंदुरी प्रकारात लॉबस्टर, जम्बो प्रॉन्स, बेबी सुरमई आणि पापलेट उपलब्ध आहे. मेन कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रांतामधील डिश सादर करताना येथे काश्मिरी, मलाबारी, आंध्रा, मालवणी प्रकारच्या विविध डिश आहेत. यात प्रॉन्स, बेबी सुरमई, सुरमई, क्रॅब, कटला या प्रकारच्या माशांच्या मस्त टेस्टी डिश उपलब्ध आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याशिवाय सीफूड क्रापॉव्ह फ्राइड राइस, प्रॉन्स आणि मच्छी बिर्याणी राइसप्रेमींसाठी आहेच. या सगळ्या डिश जरा वेगळ्या प्रकारे चाखायच्या असतील तर त्या एकदा नीर डोसा किंवा अप्पम यांच्या सोबत नक्की खाऊन बघा. लुसलुशीत नीर डोसा आणि जाळीदार अप्पम सोबत फिश एकदम हटके कॉम्बिनेशन असते. म्हणजे ते सुद्धा एकदा तरी मस्ट या प्रकारात मोडणारेच नाही का.

या वेगवेगळ्या डिश चाखण्यासाठी तुम्ही हॉटेल रागा येथे गेल्यावर तुमच्या समोर सागराची निळाई ल्यालेलं मेन्यू कार्ड समोर येतं. त्यात दोन हसणारे मासे आपल्याला एक वेगळंच तत्वज्ञान सांगतात. मला ते भारी आवडलं, तुम्हाला पण आवडतंय का बघा बरं….
HOW DO SEA CREATURES ALWAYS KNOW HOW MUCH THEY WEIGH? बघा बरं तुम्हाला या कोड्याचं उत्तर येतं का ? थोडसं डोकं चालवा बरं. अगदी सोप्पं आहे. नाही ना येत, मग मी सांगते, COZ THEY HAVE THEIR OWN SCALES….
आहे की नाही भारी…

हॉटेल रागा,
स्विमिंग पूल शेजारी, आकुर्डी, प्राधिकरण
बुकींगसाठी संपर्क साधावा.
020-27657799, 88880 77799

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.