Pune : मंडपाची परवानगी घेण्याकडे मंडळांचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज : गणेश मंडळांना मंडप कमानी आणि रनिंग मंडपाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केल्यानंतर शहरातील अनेक मंडळांनी अद्यापही परवानगी घेतली नाही. आतापर्यंत केवळ 1134 गणेश मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे शहरातील 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मंडप बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे.

मंडपा संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मंडप धोरण तयार केले आहे. मंडप, कमान, रनिंग मंडप यांना परवानगी देण्यासाठी पालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे.

मात्र,  परवानगी घेण्याकडे मंडळांनी सरळ दुर्लक्षच केल्याचे दिसत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार कालपर्यंत या दोन्ही पद्धतीने अवघ्या 1034 मंडळांनी मंडळांच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी 557 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर कामानींसाठी 147 रनिंग मंडपासाठी 74 आणि विक्रीच्या स्टॉलसाठी 293 अर्ज आले आहेत. दरम्यान, परवानगी घेणार या मंडळाची सर्वाधिक संख्या ही वडगावशेरी परिसरात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.