Nigdi : हर घर दुर्गा अभियानात मुलींनी गिरवले स्वसंरक्षणाचे धडे

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर निगडी यांच्या संयुक्त विद्यमानाने 24 ते 29 एप्रिल दरम्यान हर घर दुर्गा अभियान पार पडले. ज्यामध्ये मुलींनी महिला शौर्य (Nigdi) प्रशिक्षणाचे धडे गिरवले.

Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या हडपसर शाखेतर्फे शंभर पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक प्रदान

या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वंय सेवक संघाच्या ग्राम विकास प्रांत मंडळ सदस्या, व तात्या बापट स्मृती समिती सदस्य तसेच कुटुंब समुपदेशन व विवाहपूर्व मार्गदर्शक प्राध्यापिका निवेदिता कछवा उपस्थित होत्या. प्रशिक्षक म्हणून सिलंबम आंतरराष्ट्रीय विजेते विजय टेपगुडे सर (Nigdi)यांनी महिलांना खूप प्रभावी प्रशिक्षण दिले.

तर प्रा. निवेदिता कच्छवा यांनी महिलांचे स्वसंरक्षण आणि सामाजिक भान यावर व्याख्यान दिले , तसेच पिंपरी चिंचवड मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या फड यांनी महिलांना सुरक्षित कसे राहावे या बाबत संदेश दिला. सर्व प्रशिक्षणार्थी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत अत्यंत सुंदर लाठी काठी चे प्रत्यक्षिक केले. नंदकुमार (आप्पा) कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारतीय संस्कृती मंच व मणिकर्णिका प्रतिष्ठान याची माहिती दिली. तसेच आंतरराष्ट्रीय योगशिक्षक चंद्रकांत पांगारे यांच्या विद्यार्थींनी विविध प्रकारच्या योगासनांची प्रात्याक्षिके दिली. (Nigdi)या शिबिरामध्ये सुमारे 500 प्रशिक्षणार्थीं महिला सहभागी झाल्या होत्या.

Baramati : बारामतीत बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग; घटना सीसीटीव्हीत कैद

या प्रसंगी काही महिला खेळाडूंना सन्मानित करण्यात आले त्यात पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छ भारत अभियानाची ब्रॅण्ड अँबेसेडर व शिवछत्रपती पुरस्कार विजेती कबड्डी खेळाडू पूजा शंकर शेलार, केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या विभागात निवड झालेली कासारवाडी येथील धावपटू व रोइंग या क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य मिळालेली. वैभवी गणेश मोटे, रोलबॉल या खेळात राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली वैष्णवी दिनेश कुलकर्णी व सायकलपटू व धावपटू ऋचा जोशी व नेटबॉल या खेळात विद्यापीठ स्तरावर विशेष प्राविण्य मिळालेली (Nigdi)ज्योती खुडे यांचा समावेश होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदित्य कुलकर्णी, गिरीष देशमुख, मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, शर्मिला ब्रम्हे, मीनल शुक्ल,प्रिया देशमुख, सुजाता मटकर, अनघा काळे, योगिता शाळीग्राम, अदिती धुळे यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुष्का वैशंपायन यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शर्वरी येरगट्टीकर(Nigdi) यांनी केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.