Pimpri News : मिळकत हस्तांतर शिबिरात बदल करा – इखलास सय्यद

एमपीसी न्यूज – मिळकत हस्तांतर शिबिरात बदल करण्यात यावा. पत्नीच्या किंवा आईच्या निधनानंतर पतीच्या/मुलाच्या नावे मिळकत करण्याची प्रक्रियाही सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीच्या नावे मिळकत करण्याबाबत, महापालिकेच्या वतीने 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या निर्णयाबरोबर पत्नीच्या नावे किंवा आईच्या नावे जर मिळकत असेल, तर पत्नीच्या निधनानंतर विधुर पतीच्या नावे व मुलाच्या नावे सदर मिळकत करणे बाबत सुद्धा निर्णय घेतल्यास अनेक विधुर पतींना आणि मुलांना दिलासा मिळेल.

कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकात फक्त विधवा पत्नींना संधी देण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक महिलाचे सुद्धा निधन झाले आहे. अशा निधन झालेल्या महिलांच्या नावे जर मिळकत असेल तर ती पुरुषांच्या नावे पती किंवा मुलगा यांचे नावे हस्तांतर करण्यासाठी सदर शिबिरामध्ये सोय करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.