Pune : सभागृहात गाजला बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा

एमपीसी न्यूज – पुण्यातील मंगळवार पेठेत सिग्नलवर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेव्हापासूनच पुणे शहरातील बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. आज ( १९ ऑक्टोबर ) रोजी पुणे महानगर पालिकेच्या सभागृहात देखील याचे जोरदार पडसाद उमटले. आज ( १९ ऑक्टोबर) रोजी सर्वसाधारण सभा सुरु होताच सर्व विरोधी पक्ष यांनाी एकत्र येत बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करून, शहरात होर्डिंग पॉलिसी लागू करावी यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, रहदारी जास्त असलेल्या चौकांपासून 25 मीटर अंतरावर “होर्डिंग’ उभारण्याला परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला महापालिकेने हरताळ फसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. लोकांच्या सुरक्षिततेसह उत्पन्नात भर टाकण्याच्या उद्देशाने 2003 मध्ये आखलेले “होर्डिंग’ धोरण महापालिकेनेच गुंडाळल्याने जाहिरातदारांनी चौका-चौकात हवे तसे “होर्डिंग’ उभारल्याचे चित्र आहे.

मुळात राज्य सरकारचे 2003 चे होर्डिंग धोरण पाहायला गेलो तर  वाहतुकीला अडथळा न करता “होर्डिंग’ला परवानगी देणे, चौकाच्या मूळ रुंदीपासून 25 मीटर अंतरापर्यंत “होर्डिंग’ नको, रस्त्यापासून 40 फुटांपेक्षा अधिक उंची नसावी,  इमारतीच्या छतावरील “होर्डिंग’ची उंची 20 बाय 40 फुटांपेक्षा अधिक नसावी, महापालिकेच्या नूतनीकरणाचे प्रमाणपत्र असावे अशा अटींची यादीच आहे. मात्र प्रत्यक्षात काय मूळ धोरणातील एकाही नियमाचे पालन होत नाही. प्रचंड वर्दळ असलेल्या चौकात चार ते सहा “होर्डिंग’ला परवानगी दिल्याची परिस्थिती आहे. येथील रस्त्यांपासून दोन-चार फुटांपासूनच “होर्डिंग’साठी भलेमोठे सांगाडे उभारले आहेत. त्यात, वेगवेगळ्या परवानग्या घेऊन “होर्डिंग’ एकमेकांशी जोडले जात आहेत. शहरातील एकाही चौकातील “होर्डिंग’ वाहतुकीला अडथळा ठरत नसल्याचा दावा महापलिका आणि पोलिस करीत आहे. अनेक सांगाडे जुने झाले असून, ते मोडकळीस आल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता

तर पुणे शहरात एकूण होर्डिंगची संख्या 1,886 इतकी असून त्यातील केवळ १०० होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे प्रमुख  विजय दहिभाते यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.