Hinjawadi Crime News : सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे महिलेवर पाळत

एमपीसी न्यूज – एका सोसायटीचे चेअरमन, सचिव आणि खजिनदाराने महिलेच्या बेडरूमच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा लावून महिलेवर पाळत ठेवली. महिलेचे खासगी व्हिडीओ बनवून पाहिले. महिलेने सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास सांगितले असता त्यासाठी नकार दिला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 ते 28 सप्टेंबर या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने गुरुवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोसायटीचा चेअरमन, सचिव आणि खजिनदार या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला कोणतीच कल्पना न देताच त्यांच्या परवानगीशिवाय महिलेच्या बेडरूमच्या खिडकीच्या दिशेला तोंड करून आरोपींनी कॅमेरा बसवला. पीडित महिला खाजगी कपड्यांवर असताना तिचा व्हिडीओ बनवून तो आरोपींनी पाहिला. हा प्रकार पीडित महिलेच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी आरोपींना कॅमेरा काढण्यास सांगितले. त्यावर आरोपींनी कॅमेरा काढण्यास नकार दिला. पीडित महिलेवर सीसीटीव्हीद्वारे पाळत ठेऊन त्यांचे खाजगी कपड्यांवरील चित्रीकरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.