PCMC : अवैध बांधकाम शास्तीमाफीचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळणार; नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्ष तत्पर

एमपीसी न्यूज – अवैध बांधकामावरील शास्ती माफीची निर्णय राज्यसरकारकडून नुकताच घेण्यात आला. मूळ कराचा भरणा केल्यानंतर शास्तीची माफी होणार असल्याचे शासनाच्या अध्यादेशातून नमूद करण्यात आले. आर्थिक वर्ष संपण्यासाठी कमी कालावधी राहिला आहे. (PCMC) त्यामुळे नागरिकांना मूळ भरण्यासाठी अडचण येऊ नये या हेतूने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महत्वाच्या विभागामध्ये (झोन) कॅश काऊंटर वाढविण्यात आली असून त्यांची वेळ सुद्धा वाढविली असून आता ऑनलाईन स्वरुपात सुद्धा अवैध शास्ती माफीचे प्रमाणपत्र मूळ कराचा भरणा केल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

H3N2 Influenza Virus : भारतात H3N2 विषाणूमुळे दोघांचा मृत्यू, ही आहेत लक्षणं

नागरिकांनी अवैध बांधकाम शास्ती माफीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरिकांनी   www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील अवैध शास्ती माफी प्रमाणपत्र या लिंकद्वारे आपली सर्वमाहिती भरावी. यामध्ये आपणास झोन क्रमांक, गट क्रमांक, मालमत्ता क्रमांक, वाढीव क्रमांक भरावा. (PCMC) त्यानंतर त्यांनी मूळ कराचा भरणा केला नसल्यास विविध पर्यायाद्वारे भरणा करावा. ज्यांनी यापूर्वी भरणा केला आहे त्यांनी आपली माहीती भरून प्रमाणपत्र प्राप्त करावे. जे नागरिक कॅश काऊंटरद्वारे मूळ कराचा भरणा करणार आहेत त्यांनी आपल्या झोन मधील कॅश काऊंटरच्या माध्यमातून मूळ कराचा भरणा करावा. त्यांना मूळ कराचा भरणा केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र मिळू शकेल.

नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्ष तत्पर…

ज्या नागरिकांना मूळ कराचा भरणा करायचा असेल त्यांनी आपल्या करसंकलन विभागीय कार्यालयातील सहाय्यक मंडलाधिकाऱ्यांची मदत घेण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या द्वारे करण्यात आले आहे. यामध्ये  राजेंद्र कुंभार, आकुर्डी – मो. 9922502122, रमेश चोरघे, चिंचवड – 9922502650, सिताराम मुंढे, थेरगाव – 9922502063,  जयश्री साने, सांगवी – 9922902271,  सुषमा भरवीरकर, पिंपरी वाघेरे – 9822497389, महादेव चेरेकर, पिंपरी नगर – 9921913118, संतोष कोराड, मनपा भवन – 8308973427, सुचेता कुलकर्णी, फुगेवाडी – दापोडी – 9922502124, राजू मोरे, भोसरी – 9922932553, श्रध्दा बोर्डे, च-होली, मोशी – 8805538300,  संजय लांडगे, चिखली – 7020434155, संजय तळपाडे, तळवडे, 9760319570, अभिजित देवकर, किवळे – 9922504489,  रमेश मलये, दिघी – बोपखेल – 9881798331, जयवंत निरगुडे, वाकड – 9011488957 यांकडून नागरिक मदत घेऊ शकतात.

तब्बल…113 कोटींची अवैध बांधकाम शास्ती झाली माफ

चालू आर्थिक वर्षामध्ये 6257 मालमत्ता धारकांनी मूळ कराचा भरणा केला असून 41 कोटी 45 लाख रुपयांचा मूळ कर भरण्यात आला आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये तब्बल 113 कोटी रुपयांची अवैध बांधकाम शास्ती शासन निर्णयाला अनुषंगून माफ झालेली आहे.

अवैध बांधकाम शास्तीमुळे मूळ करांचा भरणा करण्यासाठी नागरिक उदासीन होते मात्र आता अनेकजण मूळ करांचा भरणा करण्यासाठी समोर येत आहेत ही चांगली गोष्ट आहे.(PCMC) मात्र आता मूळ करही न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर जप्ती आणि इतर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त
नीलेश देशमुख यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.