BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अनधिकृत बांधकामांवर हातोडा

एमपीसी न्यूज – मुंढवा-केशवनगर परिसरातील सर्व्हे नंबर २१ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सुमारे १७ हजार २७० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.

कारवाई अंतर्गत इमारत क्रमांक – १ येथील सुमित भंडारी व ईतर यांचे सुमारे ६ हजार ६७० चौ. फूट व इमारत क्रमांक – २ येथील मधू पोका व पिंनी बोयना आणि ईतर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. सुमारे १० हजार ६०० चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. संबंधितांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत ५२-अ, व ५३ ( १ )अन्वये दिनांक ६/६/२०१९ रोजी नोटिसा देण्यात आलेल्या होत्या.

शहर अभियंता कार्यालय, बांधकाम विकास विभाग, झोन क्रमांक- १ यांच्या वतीने कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता जयवंत सरवदे यांचे नियंत्रणा अंतर्गत व उपअभियंता किरण कलशेट्टी, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, दत्तात्रय चव्हाण, स्थानिक पोलीस कर्मचारी घाडगे, पोलिस उपनिरीक्षक,१० पोलीस कर्मचारी व अन्य जाधव, १५ बिगारी, ज्वा कटर, ब्रेकर, गॅसकटर, यांच्या सहायाने कारवाई पूर्ण करण्यात आली. पुढील कालावधीतही अनधिकृत बांधकामावर सातत्याने कारवाई केली जाईल असे महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3