Wakad News : गुटखा विक्रीप्रकरणी दुकानदाराला अटक

एमपीसी न्यूज –  परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या गुटखा विक्री (Wakad News) करणाऱ्या दुकानदाराला वाकड पोलिसांनी अटक केले आहे. ही कारवाई सोमवारी (दि.28) वाकड येथे करण्यात आली.

Chinchwad News : पिस्टल व जिवंत काडतुसासह एकाला चिंचवड येथून अटक

नारायण हेमाराम देवासी (वय 38 रा. वाकड) असे अटक आरोपीचे नाव असून पोलीस हवालदार मधुकर कोळी यांनी वाकड पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपीने बेकायदेशीर रित्या 5 हजार 500 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ त्याच्याकडे साठवून ठेवले होते.(Wakad News) त्यांची तो परिसरात बेकायदेशीरपणे विक्री करत होता. त्यामुळे वाकड पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत देवासी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.