Wakad : अवैध दारूसाठ्यावर छापा ; 210 लिटर दारू जप्त

एमपीसी न्यूज – अवैध दारू विक्री करणा-या एका महिलेच्या साठ्यावर छापा मारत 210 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली. या कारवाईमध्ये एकूण 10 हजार 500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगतापनगर झोपडपट्टी मधील एका सार्वजनिक बोळीमध्ये बेला अशोक टिडेकरी (रा. भाटनगर, पिंपरी) ही महिला अवैध गावठी दारू विकत असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार वाकड पोलिसांच्या एका पथकाने दारू साठ्यावर छापा टाकला. दरम्यान दारू विक्री करणारी महिला पोलिसांची चाहूल लागताच दारूचे कॅन जागेवर सोडून निघून गेली. पोलिसांनी 35 लिटरचे सहा कॅन आढळून आले. सर्व कॅन दारूने भरलेले होते. पोलिसांनी एकूण 10 हजार 500 रुपयांची 210 लिटर दारू जप्त केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, प्रमोद कदम, विजय गंभीरे, विक्रांत कुदळ, विक्रांत चव्हाण, अतुल इंगळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.