Bhosari Crime News : लॉजवर अवैध वेश्याव्यवसाय, भोसरीत दोन ठिकाणी कारवाई 

तीन आरोपी ताब्यात 

एमपीसी न्यूज – लॉजवर अवैध पद्धतीने सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर भोसरीत दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. वनराज हॉटेल, रेस्टॉरंट व लॉज आणि साईराज लॉज याठिकाणी शनिवारी (दि.29) भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

वनराज हॉटेल, रेस्टॉरंट व लॉज, शास्त्री चौक याठिकाणी केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक केली आहे. विश्वनाथ भोजा शेट्टी ( वय 56, रा. वनराज हॉटेल, रेस्टॉरंट व लॉज, शास्त्री चौक, भोसरी आळंदी रोड ) व प्रकाश राजीव शेट्टी (वय 50) असे अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 41 वर्षीय महिलेला पैश्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेत सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुसरी कारवाई साईराज लॉज, धावडे वस्ती भोसरी याठिकाणी केली. याप्रकरणी सद्दाम मकबुलमिया अन्सारी (वय 30, रा. धावडे वस्ती भोसरी, मुळगाव – मधुपूर, झारखंड) याला ताब्यात घेतले आहे. तर, प्रकाश आनंद शेट्टी (रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 26 वर्षीय महिलेला पैश्याचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेत 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.