Bhosari : अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणा-या दोघांना अटक

तीन टन गोमांस जप्त

एमपीसी न्यूज – अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणा-या दोघांना अटक करण्यात आली. तसेच एक टेम्पो आणि तीन टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई आज (सोमवारी) पहाटे दोनच्या सुमारास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत माता चौकात करण्यात आली.

चालक गणेश शांताराम कुऱ्हाडे, क्लिनर शाहरुख शौकत पठाण (दोघे रा. आळेफाटा, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 25, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

संगमनेर येथून एक आयशर टेम्पो (एम एच 48 / ए जी 6726) मधून गाई व बैलाचे मांस भरुन मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार समस्त हिंदू आघाडीचे गोरक्षण प्रमुख व मानद पशुकल्यान अधिकारी शिवशंकर स्वामी, मंगेश नढे, उपेंद्र बलकवडे, श्रीकांत कोळी, संतोष कबाडी, निलेश चासकर यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून या टेम्पोला पहाटे दोनच्या सुमारास भारत माता चौकात अडविले. टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्ये मागच्या बाजूला पांढऱ्या रंगाची भुस्याची पोती लावून आतल्याबाजूस ताडपत्रीमध्ये जनावरांचे मांस आढळून आले. त्यानुसार टेम्पो चालक आणि क्लिनर या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हे मांस मुंबई येथे विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी टेम्पो आणि तीन टन गोमांस जप्त करून गुन्हा दाखल केला. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालायने दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बजरंग दलाचे योगेश सासवडे, कुणाल साठे, अर्जुन बोराटे, अभिजित शिंदे, कृष्णा वाघमारे, ऋषिकेश चावरे, वैभव रासकर, नाना सावंत, प्रफुल डुंबरे, तेजस बोराटे आदींनी या कारवाईसाठी पोलिसांना मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.