Youth congress protest : बेकायदा वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज : बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात युवक काँग्रेसचे वतीने वाकड येथे आंदोलन करण्यात आले. झाडे लावा झाडे, जगवा, झाडे लावा श्वास वाचवा, जतन करा वृक्षाचे रोपण वाढवा,(Youth congress protest) आयुष्य वाचवा, पर्यावरण जपा, अशी घोषणा देत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या उद्यान विभागातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एका महिन्याच्या आत त्याच ठिकाणी झाडे लावावीत. असा शासन आदेश असतानाही मोठा काळ उलटुन गेल्यानंतरही महापालिकेतर्फे झाडे लावण्यात आली नाहीत. या बाबत जबाबदारांवर कारवाई तसेच कायद्याने त्या झाडांचे पुन्हा रोपन करण्याची मागणी युवकांनी केली.(Youth congress protest) तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एका महिन्याच्या आत झाड लावणे बंधनकारक होते. पण, झाडे लावली नाहीत. यामुळे संबंधीत अधिकारी,  कंत्राटदारांवर कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

PCET : पीसीईटीच्या समृद्धी शिंदे यांची वर्ल्ड गेम आणि नॅशनल गेम साठी निवड

युवकचे उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे  यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात वाकड युवक शाखा अध्यक्ष विक्रम कुसाळकर, उपाध्यक्ष रोहन मढीकर, संतोष ओव्हाळ, प्रकाश घोडके, अमोल देवकर, सागर हुंडे, अक्षय गायकवाड, उमेश पोकळे, प्रसाद शिरसाठे, सुमीत मंडल , (Youth congress protest) निलेश अडागळे, रोहित भाट,सौरभ शिंदे,अभिजित आटोळे,करण सोनवणे,विजय माने, रयत विद्यार्थी परिषदेचे सूर्यकांत सरवदे सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.