Pimpri : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई केएसबी चौकाजवळ चिंचवड येथे सोमवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आली.

मारुती उर्फ बबलू प्रकाश देढे (वय 22, रा. गणेश कॉलनी, पाटील नगर, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार विवेकानंद भागवत सपकाळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएसबी चौकाकडे जाणा-या रोडवर जय महाराष्ट्र चहाच्या टपरीवर एक तरुण संशयितरित्या उभा आहे. त्याच्याजवळ एक पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मारुती याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज आढळून आला. त्याच्याकडून सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावरुन त्याला अटक करून त्याच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.