PMPML News : “मी पीएमपीएमएलचा प्रवासी” स्पर्धा; लेख, उत्कृष्ठ कविता, उत्कृष्ठ फोटो, उत्कृष्ठ व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’ ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांची लाईफलाईन आहे. पीएमपीएमएल व प्रवाशांमध्ये एक दृढ नाते आणखी घट्ट व्हावे व प्रवाशांशी असलेला सुसंवाद वाढावा यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरपरिसरातील परिवहन महमंडळाच्या प्रवाशांसाठी 1 ते 31 जुलै 2022 या दरम्यान ” मी पीएमपीएमएलचा प्रवासी “ही स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ठ ” लेख, उत्कृष्ठ कविता, उत्कृष्ठ फोटो, उत्कृष्ठ व्हिडिओ या संवर्गात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

उत्कृष्ठ लेख, उत्कृष्ठ कविता, उत्कृष्ठ फोटो व उत्कृष्ठ व्हिडिओ या 4 संवर्गाकरिता विजेत्या स्पर्धकासांठी अनुक्रमे प्रथम बक्षीस म्हणून 1 वर्ष सर्व मार्गाकरिता मोफत प्रवासाकरिता बस पास, द्वितीय बक्षीस म्हणून 6 महिने सर्व मार्गाकरिता मोफत प्रवासांकरिता बस पास व तृतीय बक्षीस 3 महिने सर्व मार्गाकरिता मोफत प्रवासाकरिता बस पास बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ‘ऑनलाईन व ऑफलाईन’ पद्धतीने सहभाग नोंदवता येणार आहे.

Prof. Vijay Navle : ‘करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग!’- प्रा. विजय नवले

ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन आहेत, अशा प्रवाशांनी दिलेल्या ई-मेल आयडी व दिलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर लेख / कविता / फोटो / व्हीडीओ अपलोड करू शकतात. ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन नाही अशा प्रवाशांनी त्यांचे लेख / कविता अथवा फोटो अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, यांचे नावे परिवहन महामंडळाच्या सर्व मुख्य स्थानकांवर ठेवण्यात येणाऱ्या पेटी मध्ये प्रवासी आपली प्रवेशिका 1 ते 31 जुलै 2022 दरम्यान जमा करू शकतात. या स्पर्धेमध्ये शाळा व कॉलेजचे विद्यार्थी तसेच संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित यामध्ये सहभाग नोंदवू शकतात. स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार स्वतंत्रपणे नेमलेल्या निवड समितीमार्फत होणार असून ते उत्कृष्ठ स्पर्धकांची निवड करणार आहेत.

ऑनलाईन स्पर्धेत सहभागासाठी [email protected] या ई-मेल वरती व 9011038149 या व्हॉटस्ॲप क्रमांकावर लेख, कविता, फोटो व व्हिडीओ पाठवून सहभाग घेऊ शकता तसेच सर्व बस मध्ये स्पर्धेचे माहिती पत्रक लावण्यात येणार आहे. त्यावरती ऑनलाईन व्हॉटस्ॲप क्युआर कोड असणार आहे. तो ऑनलाईन व्हॉटस्ॲप क्युआर कोड स्कॅन करून लेख, कविता, फोटो व व्हिडिओ पाठवू शकणार आहेत. या स्पर्धेमुळे प्रवासी संख्या वाढण्याकामी तसेच प्रवाशांचे अनुभव समजून सुसंवाद वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत प्रवाशांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.