BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : चिंचवडमध्ये जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज –  चिंचवडमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे.

दुपारी दोन वाजता  मिरवणूक सुरू झाली.  सायंकाळी साडेसात नंतर मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. चिंचवड, चापेकर चौकात महापालिका आणि पोलिसांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका अर्पणा डोके, अश्विनी चिंचवडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजेंद्र गावडे, सहाय्यक्त आयुक्त संदीप खोत, अतिरीक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3