Khed Shivapur : ‘खेड-शिवापूर’ ‘टोल’ नाके तात्काळ बंद करा; अन्यथा टोल हटल्याशिवाय पाठीमागे हटणार नाही – संतोष शिंदे

संभाजी ब्रिगेड'चे बेमुदत उपोषण

एमपीसी न्यूज – खेड – शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हा, पुरंदर व इतर भागातून दररोज हजारो प्रवासी आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांना भयानक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. टोलनाका प्रशासन या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही. सध्या ‘टोलधाड’ सुरू आहे. खेड शिवापूर सह पुणे जिल्ह्यातील सर्व टोल बंद करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.

खेड-शिवापूर टोल नाका तात्काळ बंद करणार करावा, अशी मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे भोर-वेल्हा-मुळशी विधानसभेचे अध्यक्ष पंढरीनाथ सोंडकर व तालुकाध्यक्ष गणेश च-हाटे हे उपोषणाला शेकडो स्थानिक नागरिक उपोषणाला बसले आहेत.

खेड-शिवापूर टोल नाका हा भोर – वेल्हे व पुरंदर तालुक्याला लागलेला ‘शाप’ आहे. या टोलनाक्या मुळे व निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी मुळे या भागात कुठलाही नवीन उद्योग व्यवसाय, कारखाने किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून याचा विकास झालेला नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राजगड-तोरणा रायरेश्वर व सह्याद्री कडेपठार असताना शिवप्रेमी व पर्यटकांसाठी कुठल्याही सोयीसुविधा अथवा या भागाचा विकास झालेला नाही. स्थानिकांना रोजगारच्या कुठल्याही संधी उपलब्ध नाहीत.

ज्यांची हातावर पोट आहेत, ज्यांना अहोरात्र कष्ट करावे लागते. ते सगळे कामानिमित्त पुणे, मुंबई व इतर ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. शेतीला जोड धंदा करायचा म्हटले तरी पुरेशी साधने तालुकास्तरावर उपलब्ध नाहीत. त्यामुळे भोर – वेल्ह्या – मुळशी व पुरंदर या भागाचा विकास करायचा असेल तर हा खेड-शिवापूरचा टोल हटवणे ही प्राथमिक व महत्त्वाची गरज झालेली आहे. यातून होणारी आर्थिक लूट मानसिक त्रास हा येथील नागरिकांना 50 वर्ष पाठीमागे घेऊन जात आहे.

हे संभाजी ब्रिगेड कदापिही सहन करणार नाही म्हणून खेड शिवापूर टोल नाका हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी (दि. ०३) पासून बेमुदत ‘उपोषण’ जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू केले आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सचिव महादेव मातेरे, विधानसभा अध्यक्ष पंढरीनाथ सोंडकर, तालुकाध्यक्ष गणेश चऱ्हाटे, वाहतूक आघाडीचे अध्यक्ष राहुल टेंगळे, भोर-वेल्हे समन्वयक दत्तात्रेय खुटवड, हवेली तालुका अध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मुद्रा ग्रुप चे अध्यक्ष उमेश पवार, भिम आर्मीचे अध्यक्ष दत्ता पोळ, वेल्हे तालुका कार्याध्यक्ष व चित्रपट आघाडीचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, मूलनिवासी मुस्लिम संघाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, अमोल निंबाळकर, निलेश काळे, शिवाजी पाटील, जयदीप रणदिवे, रामचंद्र खुटवड, मोहिनी रणदिवे, आकाश वीर, मयूर माने, रोहित चव्हाण, सुरेश तनपुरे, विजय ओहाळ, अनिल वाडेकर, महादेव भोसले, विजय निगडे, राहुल धावले… आदी उपस्थित होते. यावेळी मुद्रा ग्रुप, भीम आर्मी, जय भीम युवा सामाजिक संस्था, भारतीय खरेदी-विक्री संघटना आदींनी पाठिंबा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like