Pimpri : यशवंतनगर येथील पुनर्वसन प्रक्रिया त्वरीत राबवा 

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष ईश्वर कांबळे यांची मागणी 

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील यशवंतनगर नेहरुनगर येथील एस.आर.ए. आणि मनपाच्यावतीने पुनर्वसन प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे भोसरी विधानसभेचे अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

या दिलेल्या निवेदनांत त्यांनी  म्हटले आहे की, यशवंतनगर नेहरुनगर येथे एस. आऱ.ए. आणि मनपावतीने पुनर्वसन प्रक्रिया सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून झोपडपट्टीचे सर्व्हेक्षण एस.आर.ए.च्या वतीने त्यांनी नियुक्त केलेले नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था मर्यादित यांचे मार्फत सुरु आहे.

मनपा सदरी नोंद असलेल्या पूर्वीच्या 65 झोपडया एेवजी 240 झोपड्यांचा सर्व्हे एजन्सी, लोकप्रतिनिधी, नियुक्त विकसक आणि  मनपा अधिकारी यांच्या संगनमताने 65 मुळच्या झोपड्या ऐवजी तब्बल 240 झोपड्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आहे. किमान यातील 150 झोपडीधारक जे सर्व्हेमध्ये दाखविण्यात आले ते सर्व बोगस नकली तसेच यशवंतनगरमध्ये ते राहिलेले नाही ते तेथील रहिवाशी नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.