Maval : टाकवे येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करणार – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – आंदर मावळला बाहेरच्या जगाशी जोडणाऱ्या टाकवे पुलाचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी दिली. 

शेळके यांनी आज (गुरुवार) आंदर मावळ भागाचा प्रचारदौरा करीत त्या भागातील मतदारांशी संवाद साधला. टाकवे गावापासून प्रचार दौऱ्यास सुरूवात झाली. फळणे, माऊ, दवणेवाडी, गभालेवाडी, मोरमारेवाडी, डोंगरगाववाडी, वडेश्वर, शिंदेवाडी, घाटेवाडी, नागाथली, वहाणगाव, कुसवली आदी गावांना सुनीलआण्णांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. ठिकठिकाणी सुनीलआण्णांचे वाजत-गाजत मिरवणूक काढून तसेच औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

दौऱ्यात त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई कदम, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस सुदाम कदम, तालुका उपाध्यक्ष शिवाजी असवले सरपंच सुप्रिया मालपोटे, माजी उपसरपंच अविनाश असवले, बाबाजी गायकवाड तसेच नंदू असवले, किसन ननवरे, अविनाश जाधव, राजू असवले, आंदरमावळ संघटनमंत्री नारायण ठाकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास मालपोटे तसेच बाबाजी मालपोटे बंडोबा मालपोटे, किसन मालपोटे, नामदेव मालपोटे, छगन लष्करी, शांताराम लष्करी, बबन ओव्हाळ, माऊचे सरपंच गुलाब गभाले तसेच दीपक मोरमारे, मोहन मोरमारे, एकनाथ मोरमारे, मछिंद्र मोरमारे, नितीन गभाले, सुभाष गभाले, मनोहर हिले, जाणकू गभाले, नामदेव गवारी, रामदास शिंदे, दत्तात्रय खांडभोर, राजू खांडभोर, मिथून खांडभोर, योगेश आगीवले, तानाजी शिंदे, सबाजी शिंदे ,सोमनाथ शिंदे, सहादु शिंदे, कैलास खांडभोर, मुकुंद खांडभोर, विकास खांडभोर, राजू शिंदे, शंकर खांडभोर, दीपक खांडभोर, गोविंद खांडभोर, पंचायत समितीच्या माजी सदस्य ललिता कोतुळकर, प्रकाश पवार, निवृत्ती वाडेकर, बळीराम वाडेकर, स्वप्नील वाडेकर, लहु वाडेकर, सुधीर कुडे, दिगंबर कुडे, नथु वाडेकर, संगीता वाडेकर, ललिता पवार, कुसवलीच्या सरपंच फसाबाई चिमटे, माजी उपसरपंच रंजना चिमटे, अंदर मावळ महिला अध्यक्ष संगीता शिंदे तसेच सविता भालेराव, सुशीला वाजे, सारिका कशाळे, नाथा चिमटे, अमोल चिमटे, ज्ञानेश्वर चिमटे, गौतम भालेराव, नारायण चिमटे,बंडू चिमटे, दीपक शिंदे आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेळके म्हणाले की, इंद्रायणी नदीवरील टाकवे येथील पूल खूप जुना व धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले की, आंदर मावळामधील गावांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. पुलाचे कठडे तुटल्याने अपघातही होतात. त्या ठिकाणी दुसरा जास्त उंचीचा पूल बांधण्याचा प्रस्ताव गेली कित्येक वर्षे धूळ खात पडून आहे. आपण हे काम लवकरात लवकर मार्गी लावू.

स्थानिक रहिवाशांनी सुनीलआण्णांच्या कामाची प्रशंसा केली व मावळात परिवर्तन घडविण्यासाठी आण्णांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like